16.2 C
New York
Monday, October 14, 2024

Buy now

जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचा जिल्हाधिकारी भवनावर मोर्चा 

सिंधुदुर्ग : माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांच्या पवित्र पोर्टल , शिक्षक नियुक्ती, शिक्षकेतर कर्मचारी मान्यता, टप्पा अनुदान, मूल्यांकन पात्र ठरलेल्या सर्व मुख्याध्यापक विद्यालयांना अनुदान, शाळा तेथे मुख्याध्यापक प्रयोगशाळा कर्मचारी , कला क्रीडा शिक्षक भरती यासह मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला व न्याय मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. त्यांनी ते स्विकारून संघटनेच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्या बाबतचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.

सिंधुदुर्ग नगरी येथे सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने ओरोस रवळनाथ मंदिर तेजिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष वामन तर्फे, कार्यवाह गुरुदास कुसगावकर, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, अजित परब, म्हाडगुत आदी शेकडो शिक्षक या मोर्चात सहभागी झाले. यावेळी न्याय मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध घोषणा देण्यात आल्या.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागांमध्ये शासन स्तरावर अनेक विषय प्रलंबित आहेत. या विविध मागण्यांच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या दिनांक १९ जुलै २०२४ रोजी पुणे येथे संपन्न झालेल्या सभेत ठरल्यानुसार या मागण्यांची जाणीव शासनाला होण्यासाठी आजच्या या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पवित्र पोर्टल वरील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना जाहीर करावी शिक्षकेतर भरती करावी व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या मान्यता मिळाव्यात.

अल्पभाषिक व अल्पसंख्यांक शाळातील रिक्त पदांची १००: शिक्षक भरती करण्याची परवानगी मिळावी. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने ताबडतोब जाहीर करावा. वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार शाळांना मिळावे. १५ मार्च २०२४ च्या सेवक संच शासन निर्णयात दुरुस्ती व्हावी. वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर भरतीसाठी परवानगी मिळावी. मुल्यांकन पात्र ठरलेल्या सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयांना अनुदान जाहीर करणे. शाळा तेथे मुख्याध्यापक, प्रयोगशाळा कर्मचारी देणे शाळा तेथे कला, कीडा, शिक्षक भरती करणे. शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करणे शिक्षकेतर संचमान्यता नवीन निकषानुसार अतिरिक्त ठरलेल्या वरिष्ठ लिपिकांना सेवानिवृत्ती पर्यंतत्याच शाळेत कार्यरत ठेवावे. अंशतः अनुदानित माध्य. व ए.माध्य. 20% व 40% व 60% अर्धवेळ शिक्षकानापूर्णवेळ करणे या सहन्याय मागण्यांचे निवेदन देण्यात आले

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!