10.6 C
New York
Monday, October 14, 2024

Buy now

वेंगुर्लेत नागोबा बनविणे स्पर्धा

दिपक केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व वेंगुर्ले तालुका शिवसेना पुरस्कृत

वेंगुर्ले : शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग आयोजित व दिपकभाई केसरकर मित्रमंडळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुका शिवसेना पुरस्कृत श्रावण महोत्सव अंतर्गत गुरूवार दि. ८ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता स्वामिनी मंडपम् वेंगुर्ले येथे बालवाडीसाठी नागोबा चित्र रंगविणे तर प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चिकण मातीचे नागोबा बनविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेअंतर्गत बालवाडी गटासाठी रंगभरण स्पर्धा वेंगर्ले तालुक्यातील बालवाडी, अंगणवाडी, ज्यनियर केजी व सिनीयर केजी यामध्ये शिकणाऱ्या चिमुकल्यांसाठी होणार आहे. सर्व स्पर्धकांना आयोजकांकडून नागोबाचे चित्र असला ड्राईंगपेपर पुरविण्यात येईल. केवळ आयोजकांनी पुरविलेल्या ड्राईंग पेपर वरील नागोबाचे चित्र चिमुकल्या स्पर्धकांनी आपल्या कौशल्याने कलर पेन्सिल व तेलकट खडूंचा वापर करून रंगावायचे आहे. चित्र रंगविण्यासाठी एक तासाची वेळ ठेवण्यात आली आहे.

या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ५००, ३००, २०० रोख बक्षिस व चषक व उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना १५०, १०० अशी बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

प्राथमिक व माध्यमिक गटासाठीची स्पर्धा वेंगुर्ले तालुक्यासाठी मर्यादीत आहे. प थिमिक व माध्यमिक गटातील मुलांना गणपती मुर्ती बनविण्याच्या चिकण मातीपासून स्पर्धा स्थळी नागोबा बनवायचे आहेत. प्राथमिक गटांत पहिली ते सातवीपर्यतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे तर माध्यमिक गटात आठवी ते दहावीपर्यतच्या मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. या स्पर्धेसाठी लागणारी चिकण माती स्पर्धकांनी आणावयाची आहे. ती आयोजकांकडून पुरविली जाणार नाही त्यासाठी स्पर्धकांनी विचारणा करू नये. नागोबा एक फुटापेक्षा जास्त उंचीचा नसावा. नागोबा रंगविण्याची गरज नाही. नागोबा बनविण्यासाठी ८० मिनीटांचा वेळ दिला जाणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी नियोजीत वेळेत उपस्थित रहावे. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. आगावू नाव नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. या स्पर्धेती प्राथमिक गटांतील प्रथम तीन अनुक्रमे ७००, ५००, ३०० यांना रोख बक्षिसे व चषक व उत्तेजनार्थ दोन व माकांना २००, १०० अशी रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर माध्यमिक गटांतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १,०००, ७००, ५००, बक्षिसे व चषक व उत्तेजनार्थ दोन क्रमाकांना ३००, २०० अशी रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.

या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व सहभागासाठी मिताली मातोंडकर- ७०६६८०२१५५ यांचेशी संपर्क साधावा. वेंगुर्ले तालुक्यातील शाळा, हायस्कुलमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या अंगीभुत कलागुणांना चालना देण्यासाठी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर व शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!