26 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

स्वतःच्या गावचा पत्ता नाही त्यांची मनीष दळवींवर टीका करण्याची पात्रता नाही

राजबा सावंत यांचं प्रथमेश तेलींना प्रत्युत्तर

उगाच या भागात ढवळाढवळ करू नये ; अन्यथा सायमन गो बॅक” नारा द्यावा लागेल

वेंगुर्ला : ज्या प्रथमेश तेलींना स्वतःच्या गावचा पत्ता नाही त्यांची जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यावर टीका करण्याची पात्रता नाही, असा पलटवार होडावडे उपसरपंच राजबा सावंत यांनी केला आहे. दरम्यान बाहेरून येऊन या भागात राजकीय ढवळाढवळ करण्याची गरज नाही, असा चिमटाही त्यांनी काढला आहे. पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते येथील राजकारण व येथील विकास करण्यास समर्थ आहेत. परंतु, यापुढे अशीच लुडबुड चालू राहिल्यास स्थानिक, सामान्य कार्यकर्त्याना एकत्र घेऊन “सायमन गो बॅक” सारखा नारा द्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की, मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली होडावडा ग्रामपंचायतीत २००३ पासुन सलग १५ वर्ष एकहाती सत्ता राखली तसेच मागील वर्षी ७ सदस्य निवडुन आणलेत. त्यामुळे मी स्वतः उपसरपंच आहे. य होडावडा विकास संस्थेत २००२ पासून कायम एकतर्फी निवडणुका जिंकुन एकहाती सत्ता राखलेली आहे. विकास संस्था, खरेदी विक्री संघ आणि जिल्हा बॅंक या ठिकाणी निवडणुका जिंकुनच अध्यक्ष झालेत. त्यामुळे तुमच्यासारख्या राजकीय वय वर्षा पेक्षा जास्त संस्थांमध्ये मागील दोन दशके ते काम करतात याची माहीती करुन घे ऊगीच अज्ञान पाजळन्याचा प्रयत्न करु नये असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. दरम्यान राणेंच्या निवडणुकी दरम्यान तो स्टेटस ठेऊन राणेंच्या निर्णयाला आव्हान देण्याचा आणि साहेबांच्या विजयात आणि मताधिक्यात बाधा निर्माण करण्याचा तसेच स्वतःचे नसलेले महत्त्व वाढविण्याचा केलेला तो केविलवाणा प्रयत्न होता. याबाबत स्टेट्स बाबत स्वतः राणेसाहेबांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केलेली होती, असे त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दळवींच्या नेतृत्वात आमच्या गावातून ५८३ मताधिक्य आणि तुळस जिल्हा परिषद गटामधून २,६०६ चे मताधिक्य तसेच वेंगुर्ला तालुक्यातून ९,७०० चे मताधिक्य मिळाले असल्याचे देखील नमूद केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!