सावंतवाडी : सिंधुदुर्ग आरटीओ विभागाच्या भ्रष्टाचाराबाबत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या समर्थकांनी केली आहे.
कार्यालयात चाललेल्या विविध भ्रष्टाचाराबाबत त्याचप्रमाणे लक्झरी बीस मधून होत असलेल्या मालवाहतूक तसेच विनापरवाना विना जीएसटी व मुंबई गोवा महामार्गावर साईन बोर्ड तसेच ॲम्बुलन्स नंबर हेल्पलाइन नंबरचे फलक अशा आरटीओ कडून चाललेल्या विविध भ्रष्टाचाराबाबत माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक तथा वाहन चालक असोसिएशन सिंधुदुर्ग अध्यक्ष विजय जांभळे उपाध्यक्ष स्वप्निल जाधव त्याचप्रमाणे माजी आमदार उपरकर समर्थक राजाराम आबा चिपकर व मंदार नाईक यांनी सोमावारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरटीओ कार्यालय सिंधुदुर्ग यांना त्यांचा भ्रष्टाचार दाखवून देऊ असा इशारा दिला आहे.
यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर उपस्थित राहणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करणार असल्याचे इशारा उपरकर समर्थक तथा वाहन चालक असोसिएशन सिंधुदुर्ग चे अध्यक्ष विजय जांभळे व मंदार नाईक यांनी दिला आहे.