खा. नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा होणार नागरी सत्कार
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे विस्तारित अधिवेशन सावंतवाडी शहरातील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात उद्या ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.
या अधिवेशनात प्रदेशचा एक नेता तसेच माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील,आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांसह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या अधिवेशनात लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार खासदार नारायण राणे तसेच अलीकडेच झालेल्या निवडणुकांमध्ये कोकणची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचाही नागरी सत्कार करण्यात येणार असून या अधिवेशनात भाजपचे एक हजारहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.