-0.8 C
New York
Wednesday, January 15, 2025

Buy now

विदेशी महिला सापडली जंगलात झाडाला बांधलेल्या अवस्थेत

सावंतवाडी : सोनुर्ली – रोणापाल हद्दीवरील जंगल परिसरात एक विदेशी महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली असल्याने खळबळ उडाली आहे. ही महिला शनिवारी सकाळी एका गुराख्याच्या निदर्शनास आली. त्यानंतर याबाबत पोलीसांना माहिती देताच पोलीसांनी घटनास्थळी येत तिला सोडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या उजव्या पायाला साखळदंड घालून
एका झाडाच्या बुंध्याला कुलुपबंद करण्यात आले होते. सलग तीन दिवस ती याच अवस्थेत होती. उपाशी राहिल्याने ती महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती. जंगलात सोनुर्लीतील काहीजण गुरे चालण्यासाठी गेले असता या महिलेचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यावर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, तिच्या पतीकडून हा प्रकार घडला असावा असा अंदाज सावंतवाडी पोलिसांनी व्यक्त केला आहे. सद्यस्थितीत या महिलेवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ती काही बोलू शकत नसल्यामुळे अधिक तपास करण्यात अडचण येत असल्याचे पोलीसांनी सांगितले.

दरम्यान, तिच्याकडे सापडलेल्या कागदपत्रावरून संबंधित महिलेचे नाव ललिता कायी कुमार एस असून ती तामिळनाडूमधील रहिवासी आहे. ती मूळ अमेरिकन नागरिक असल्याचे देखील समजते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!