0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या यशस्वी वर्षपूर्ती निमित्त सत्कार

जिल्हा कार्यकारणीत जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते सन्मानित

सिंधुदुर्ग । मयुर ठाकूर : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या यशस्वी वर्षपूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. आज सिंधुदुर्ग ओरोस येथे झालेल्या भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत त्यांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या पदाला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षाच्या कार्यकालात त्यांनी आपल्या नेतृत्वात झालेल्या तीन निवडणुकांमध्ये पक्षाला घवघवीत यश प्राप्त करून दिले. यात शिक्षक आमदार निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे, लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे तर अलीकडेच झालेल्या कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आमदार निरंजन डावखरे यांच्या यशात मोलाचा वाटा उचलला. जिल्ह्यातील भाजपच्या व महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोट बांधून त्यांनी केलेले कार्य निश्चितच वाखाणण्याजोगे व कौतुकास्पद आहे अशा शब्दात यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी त्यांचा गौरव केला.
यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली, जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक संचालक तथा आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रमोद कामत, वेंगुर्ले चे माजी नगराध्यक्ष राजन गिरप, दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, मंदार कल्याणकर, सावंतवाडीचे माजी नगरसेवक उदय नाईक, आनंद नेवगी, राजू बेग, गुरु मठकर, माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, दिपाली भालेकर, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, सचिन बिर्जे, मेघना साळगावकर, विनोद सावंत, परिक्षीत मांजरेकर, सत्यवान बांदेकर आदिंसह भाजपचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!