9.2 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

वरवडे गावच्या सुपुत्राची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील खेलो इंडिया उपक्रमांतर्गत बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

अथर्व सादये चे होतेय सर्वत्र कौतुक

कणकवली | मयुर ठाकूर : वरवडे गावचा सुपुत्र बॅडमिंटनपटू अथर्व सादये याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील केंद्र सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमांतर्गत बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल अथर्व चा स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडे च्या वतीने वरवडे गावचे सुपुत्र युवा उद्योजक अचित कदम यांच्या सौजन्याने शाल, पुष्पगुच्छ देत विशेष सत्कार करण्यात आला. अचित कदम यांच्या सौजन्याने अथर्व ला बॅडमिंटन किट भेट देण्यात आले. यावेळी कणकवली तालुका शेतकरी खरेदीविक्री संघाचे चेअरमन तथा माजी पं स सभापती प्रकाश सावंत, युवा उद्योजक अचित कदम, माजी उपसरपंच आनंद घाडीगांवकर, मंदार मेस्त्री, सागर राणे आदी उपस्थित होते. अथर्व हा वरवडे फणसनगर चा रहिवासी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील ग्रामीण भागातील खेळाडूंचे प्राविण्य समोर यावे, युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळावे यासाठी खेलो इंडिया हा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम सुरू केला. वरवडे सारख्या ग्रामीण भागातील अथर्व ने अथक मेहनत आणि खडतर प्रॅक्टिसने आपल्या क्रीडागुणांच्या जोरावर खेलो इंडियामध्ये प्रवेश मिळवत वरवडे गावचे नाव रोशन केले आहे. याबद्दल त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देत उपस्थितांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!