0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

डॉक्टरवरून प्रशासनाचे उपटलेले कान योग्यच – धिरज परब

कुडाळ : आम्ही राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकांनी न्यायासाठी केलेला पत्रव्यवहार, तक्रार अर्जास जिल्हा प्रशासनाकडून नेहमीच केराची टोपली दाखवली जाते. पत्रांची कोणतेही दखल न घेणारे जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रशासन यांची अब्रूची लक्तरे दस्तुरखुर्द पालकमंत्री महोदयांनी काढली. गेली दीड वर्ष 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला उपोषणे, निवेदने देऊन थकलेल्या गोरगरीब अन्यायग्रस्त शेतक-यांना काल मिळालेला सुखद आनंदाचा धक्काच आहे.

ज्या भूमाफिया डॉक्टरचे नाव पालकमंत्र्यांनी विचारल्यानंतर प्रांताधिकार्याने सांगितले. पण कलेक्टर महाशयांनी आपल्या केबिनमध्ये कायम वावर असलेल्या डॉक्टरला आपण चक्क ओळखतच नसल्याचे मीडिया आणि पालक मंत्र्यांसमोर सांगितले. यामधून या भूमाफिया डॉक्टरची प्रशासनावर असलेली पकड लक्षात येते. आपला मूळ सेवाभावी डॉक्टर दात काढण्याच्या व्यवसायाच्या आड या व्यक्तीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात, शहरातील मोक्याची जागा असो, किनारपट्टी असो वा निसर्गरम्य ठिकाण असो याने आपल्या दाताने लचके तोडले आहेत. आणि परप्रांतीय दिल्लीकरांचे पोट भरत आहे. अशा या सो कॉल्ड व्हाईट कॉलर, निरागस चेह-यामागे खूप अदृश्य शक्ती कार्यरत आहेत. म्हणूनच मंत्रालयापासून ते जिल्ह्यातील सनदी अधिका-यांपर्यंत सर्वच यंत्रणा टिचकीवर याची काम करते. याचे उदाहरण म्हणजे याच डॉक्टरने मौजे कुडाळ मधील मोक्याच्या जागेवर शैक्षणीक आरक्षण असलेल्या गोष्टीचा फायदा घेऊन 5.50 एकर जागा कमीदरात पाडुन नंतर महसुल विभाग व नगररचनाकार विभाग यांना हाताशी धरुन शैक्षणीक झोन उठवुन हीच जागा शेकडो पट चढ्या दराने विक्री केली त्यात ही जागा घेणेसाठी शेतक-यांच्या ठेवीवर असणारी जिल्हा बँकेकडुन आंबाबाग व कृषी पर्यटन प्रकल्पाच्या नावाखाली सर्व अटी शर्तीना बगल देत तब्बल 6.50 कोटी रुपये कर्ज तीन दिवसामध्ये 29/06/2016 रोजी संचालक बैठकीमध्ये मंजुर करुन घेतले. सर्वसामान्य गरीब शेतकरी व नवउद्योगांना कर्ज देताना नियमांच्या कात्रीत पकडणा-या बँकेने मात्र या भुमाफीयाला कर्ज देताना तत्परता दाखवली आहे.

आमच्या तक्रारीनंतर जि. उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग यांनी केलेल्या चौकशीमध्ये उचल केलेले कर्ज हे जमीन मालकास न देता परस्पर कर्जदाराच्या फर्मच्या चालु खात्यात वळवण्यात आले व जागेचे व्हॅल्युएशन करण्यात आले नाही प्रोजेक्ट रिपोर्ट वर सी एच्या सह्या नाहीत व कर्ज मंजुरी नियमबाह्य पद्धतीने करुन मंजुर कर्ज कृषी या पर्यटनासाठी वापरले गेले नाही. असे अनेक ताशेरे बॅकेच्या ऑडीट रिपोर्ट मध्ये आहेत. मात्र काल पालकमंत्र्यांनी सासोली जमिन फसवणुक प्रकरणी संबंधित डॉक्टरवर तात्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करून हद्दपारीच्या कारवाईचे आदेश मा. पोलिस अधीक्षकांना दिले व फिर्यादी आपण स्वतः होवु असे ऑन कॅमेरा सांगितले.

जिल्ह्यातील ही भूमाफियांची विषारी वेल वेळीच तोडली पाहिजे. जिल्ह्यातील मोठे अधिकारी यांच्या आलिशान गाड्यांमधून फिरतात पहावयास मिळतात .. या माफियांच्या बंगल्यावर पार्त्यां झोडताना दिसतात. अशी काळी कृत्य करणा- यांवर प्रशासन कारवाईसाठी पुढे आल्यास ऑडिट रिपोर्ट कागदपत्रे, माहिती पुरावे, प्रशासनास गरज भासल्यास आम्ही देवु.

ह्या स्पेशल डॉक्टरचे लोण पुन्हा कुडाळात नव्याने येत आहे. परप्रांतीय दिल्लीकरांना सोबत घेऊन 50 एकर क्षेत्रात बंगलो, एन ए प्लॉट, आलिशान सदनिका प्रोजेक्ट केले जात आहेत. एका तलावाशेजारी हा प्रोजेक्ट होत आहे. अशा जाहिराती शहरात मोठ्या होर्डिंग वरती लावल्या गेल्या, या क्षेत्रात होणा-या परप्रांतीय वस्तीसाठी गावच्या तलावातून पाणी वापर केला जाणार आहे. तेथील रहिवाशांना भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे हे निश्चीतच. इतर ठिकाणी 50 बॉडीगार्ड घेऊन फिरणारा हा तथाकथित डॉक्टर कुडाळात परप्रांतीयांसोबत आपला शहाणपणा दाखवेल तर नक्कीच त्याला चांगला इंगा आम्ही दाखवु, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!