कणकवली : घोणसरी, खवळेभाटलेवाडी येथे विजेचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. घराच्या अंगणात तारेवर वाळत घातलेले कपडे काढताना जोरदार विजेचा शॉक लागल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
घोणसरी, खवळेभाटलेवाडी येथील विनया विनोद कारेकर (३५) ही महिला सोमवारी शेतात गेली होती. सायंकाळी ती घरी परतल्यानंतर अंगणात तारेवर वाळत घातलेले कपडे काढायला गेली असता विजेचा शॉक लागून तिचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली, सासू, सासरे असा परिवार आहे.