28.1 C
New York
Saturday, April 19, 2025

Buy now

मोटार सायकल चोरीतील आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश

बुलेट मोटार सायकल केली हस्तगत

कणकवली : कुडाळ शिवाजी महाराज पार्क, तुपटवाडी येथून बुलेट मोटर सायकल (एमएच ०७ एएम ८९३७ ) ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने संमती शिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेलेली होती. भारतीय दंड विधान कलम १७९ प्रमाणे गुन्हा १३ जून २०२४ रोजी दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोटार सायकल चोरीतील आरोपींना अटक करत चोरीतील बुलेट मोटार सायकल हस्तगत केली.

मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक यांनी सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे मोटार सायकल चोरीचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून विशेष पथके नियुक्त केली होती.

या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना ११ जुलै २०२४ रोजी गुन्ह्यात चोरीस गेलेली बुलेट मोटर सायकल ही गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथे राहणाऱ्या दोन चोरट्यांनी चोरल्याचे तपासामध्ये उघड झाले. पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!