-0.8 C
New York
Tuesday, January 14, 2025

Buy now

रेल्वे ट्रॅक्शनच्या वर्कशॉपमधील कॉपर तार बंडल चोरी प्रकरणात एकास अटक | कणकवली पोलिसांची कारवाई

कणकवली : येथील रेल्वे ट्रॅक्शनच्या वर्कशॉपमधील रुमच्या शटरचे लॉक तोडून रुममधील २ लाख ३४ हजार किंमतीचे कॉपर तार बंडल आणि कॉपर कंडक्टरचे तुकडे चोरल्या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी कोल्हापूर पन्हाळा येथील भंगार विक्रेत्या संशयित आरोपी हंबीरराव सावळा गोसावी (४९, रा, कोडोली) याला बोलेरो पिकअप टेम्पोसह अटक केली. कणकवली पोलिसाच्या या धडक कारवाईबद्दल कौतुक होत आहे.

या गुन्ह्यात कणकवली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत फुटेज मिळवत या आरोपीला पकडण्यात यश मिळवले. चोरीची घटना २२ ते २४ जून या कालावधीत घडली. याबाबतची फिर्याद रेल्वे इंजिनियर संजीवकुमार बेलवलकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली.

या गुन्ह्याचा तपास कणकवली पोलीस, रेल्वे पोलीस तपास करत होते. कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे, पोलीस पाटील यांच्या पथकाने कोल्हापूर पन्हाळा कोडोली येथे ही कारवाई केली. गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजता सुमारास हंबीरराव गोसावी याला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप टेम्पो जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपींचा भंगार विक्री व्यवसाय आहे. या चोरीच्या गुन्ह्यात त्याच्या सोबत अन्य काही संशयित आरोपी आहेत, ते सर्वही आरोपी पोलिसांच्या रडारावर असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!