28.3 C
New York
Thursday, July 25, 2024

Buy now

मराठा आरक्षणावर विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका काय ? आमदार राणे यांनी विचारला जाब

कणकवली : मराठा आरक्षणावर विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका काय ? त्यांना मराठा समाजाला आरक्षण स्वतंत्र पाहिजे की ओबीसी मधून द्यावे याबाबतची भूमिका जाहीर करावी. विरोधी पक्षाचा हा नकली चेहरा कधीतरी महाराष्ट्र समोर आला पाहिजे मराठ्याने ओबीसी तरुणांचे भविष्य अंधारात टाकण्याचे काम हे विरोधी पक्षाचे नेते करत असल्याची स्पष्ट भूमिका आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या सभागृहात मांडताच सेम सेम च्या घोषणा देत नितेश राणे यांच्या भूमिकेला सत्ताधारी आमदारांनी पाठिंबा दर्शवला.मराठा आरक्षण बैठकीला विरोधी पक्ष नेते आणि आमदार उपस्थित राहिले नाहीत त्या वरून आज भाजप आणि सत्ताधारी आमदारांनी विरोधकांना सभागृहात घेरले.यावेळी आमदार नितेश राणे बोलत होते.
मराठा आरक्षण विषयीच्या कालच्या बैठकीत अनुपस्थित राहिलेल्या विरोधी पक्षाचे खरे चेहरे दिसले.मराठा ओबीसी तरुणांनी आपली डोकी फोडायची, केसेस घ्यायच्या आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या लोकांनी पेटवा पेटवीची भाषा करायची. जेव्हा चर्चा करायची,योग्य निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा हेच विरोधक पळणारे आहेत.अशी टीका आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत सभागृहात विरोधकांवर केली.
घराघरात वाद निर्माण करणारे विरोधी पक्ष आहेत. यांनी मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे.विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका काय? त्यांना मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण हवंय की ओबीसी मधून मराठा आरक्षण हवंय हे त्यांनी जाहीर करावं. यांची नेमकी भूमिका काय तें जाहीर करावं. समाजाची धुळफेक करून समाजाच्या तरुणांचे भविष्यात अंधारात टाकणारे हे लोक आहेत.अशी टीका करतानाच मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आध्यक्षतेखली आयोजित बैठकीला उपस्थित न राहिल्याने विरोधी पक्षावर आमदार नितेश राणे यांनी सभागृहात जाब विचारत टीका केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!