कणकवली | मयुर ठाकूर : सिंधुदुर्गातून – पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा फोंडाघाट राज्य महामार्ग दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. या रस्त्यालगत असलेले रिटर्निंग ऑल तुटुन गेली असून वाहतुकीस हा घाट धोकादायक बनला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बांधण्यात आलेले फोंडा घाटातील येथिल रिटर्निंग ऑल जवळ्पास तीन वेळा बांधलेले रिटर्निंग ऑल तीन वेळा कोसळून जमीनदोस्त झाली आहे. या फोंडाघाटाची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी पाहणी केली. यावेळी या घाटाचे रिटर्निंग ऑलचे कामाची पाहणी केली. त्यावेळी फोंडाघाटात सूरु असलेले काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. उत्कृष्ट दर्जाचे काम करून ,सर्वसामान्य वाहन चालकांच्या जीवाशी खेळणाऱ्या त्या अभियत्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता कमलिनी प्रभू यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाई तावडे ,माधवी दळवी, संतोष टक्के ,संजना कोलते ,सुंदर पारकर ,सुरेश टक्के यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.