सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेत सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून उद्या ९ जुलै २०२४ रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
यात महाविद्यालय, शाळा, शैक्षणिक संस्था यांच्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुट्टे यांनी आज सायंकाळी दिले आहेत.