32.5 C
New York
Tuesday, July 1, 2025

Buy now

पुरात अडकलेली गाडी ढकलण्यासाठी आमदार वैभव नाईक स्वतः उतरले पाण्यात!

ओरोस, कसाल येथे आ. वैभव नाईक यांनी केली पूरस्थितीची पाहणी

आमदार वैभव नाईक यांच्या तत्परतेबद्दल नागरिकांमधून होतेय समाधान व्यक्त

कणकवली | मयुर ठाकूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस सुरू असून ओरोस, कसाल येथे पूरस्थिती उद्भवली आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. याची माहिती मिळताच कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तातडीने याठिकाणी भेट देत पाहणी केली. घरात पाणी गेलेल्या नागरिकांची तात्पुरती राहण्याची व जेवणाची व्यवस्था करत त्यांना धीर देण्यात आला. त्यांना आवश्यक वस्तू पुरविण्याचे नियोजन केले. जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर ओसरगाव येथे पुराच्या पाण्यात एका नागरिकाची चारचाकी गाडी अडकली होती. ही गाडी चालू करण्यासाठी आ. वैभव नाईक यांनी प्रयत्न केले. मात्र गाडी बंद पडल्याने आ. वैभव नाईक यांनी स्वतः गाडी ढकलून ती पाण्याबाहेर काढण्यासाठी मदतकार्य केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!