22.5 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

दोन मालवाहू टेम्पो अपघातग्रस्त | इन्सुली घाटी येथील प्रकार

बांदा : जुन्या मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली घाटीत गुरुवारी दोन टेम्पो अपघातग्रस्त झालेत. गोव्यातून बेळगावकडे गॅस सिलेंडर वाहतूक जाणारा टेम्पो समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोला साईड देताना रस्त्यानजीक केबलसाठी खोदलेल्या गटारात कलंडला. तर त्याच आयशर टेम्पोचा काही अंतरावर टायर फुटल्याने गटारात कलंडला. सुदैवाने समोर वाहन नसल्याने अनर्थ टळला. यात टेम्पोचे मोठे नुकसान झाले. याबाबतची नोंद बांदा पोलीसात उशिरापर्यंत नव्हती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोव्यातून गॅस सिलेंडर वाहतूक करणारा आयशर टेम्पो सावंतवाडीच्या दिशेने जात होता. समोरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोला साईड देताना टेम्पो रस्त्या नजीक खोदलेल्या गटारात रुतला. मात्र, गोव्याच्या दिशेने जाणारा टेम्पो पुढे काही अंतरावर टायर फुटल्याने सात जांभळी नजीकच्या उतारावर कलंडला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य केले. बांदा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने दोन्ही टेम्पो बाहेर काढण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!