22.3 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

कणकवली ‘विद्यामंदिर हायस्कूल’मध्ये मुलींना पासचे वितरण

कणकवली : येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत कणकवली एसटी आगार व्यवस्थापक श्री. परब व अन्य अधिकाऱ्यांच्या हस्ते मुलींना शासकीय मोफत एसटी पास वितरित करण्यात आले.

यावेळी प्रशालेतील मुलींना मोफत एसटी पास योजनेचे विभागप्रमुख ग्रंथपाल एम. डी. पवार व प्रयोगशाळा सहायक आर. जी. तवटे यांनी प्रशालेतील प्रवास करून शिक्षण घेणाऱ्या मुलींचे सर्व प्रकारचे कागदोपत्री कामकाज योग्यरीत्या पूर्ण केले. त्यांनी मोफत पास सवलतीची योजना यशस्वीरीत्या पूर्ण केली.

प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांनी कणकवली आगार व्यवस्थापक यांना एसटी बसचे वेळापत्रक व शाळेचे वेळापत्रक यांच्या वेळेचा समन्वय घडून आला तरच विद्यार्थांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळेल, अशा सूचनाही दिल्या. पर्यवेक्षक वृषाली जाधव यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!