-0.8 C
New York
Tuesday, January 14, 2025

Buy now

रोहित ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आशिये शाळेतील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कणकवली | मयुर ठाकूर : तालुक्यातील आशिये येथील रोहित ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण प्राथमिक शाळा, आशिये शाळेतील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आशिये गावातील भाजप कार्यकर्ते रोहित ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आशिये शाळेतील मुलांना वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर इ. शैक्षणिक साहित्य रोहित ठाकूर आणि सामाजिक कार्यकर्ते समीर ठाकूर यांच्या माध्यमातून माजी सरपंच शंकर गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरित करण्यात आले.

तसेच कलमठ बाजारपेठ शाळेतील विद्यार्थ्यांना सरपंच संदीप मेस्त्री यांच्या उपस्थितीत जिलेबी वाटप करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, आशियेच्यावतीने समीर ठाकूर यांची सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे त्यांचही अभिनंदन करण्यात आल.

यावेळी आशिये येथील समीर ठाकूर, अमित ठाकूर, मुख्याध्यापिका सौ. सावंत, सौ. मोरे. श्री. कदम, रोहन ठाकूर, लखन इंगळे, प्रथमेश इंगळे, विशाल इंगळे, मांतेश देवरमानी, राठोड तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!