-0.8 C
New York
Tuesday, January 14, 2025

Buy now

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कणकवली शहरातील लाभार्थी महिलांसाठी विशेष मदत कक्ष | माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा उपक्रम

कणकवली | मयुर ठाकूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना कागदपत्र गोळा करण्यास काही प्रमाणात अडचणीत येत असल्याने याबाबत महिलांना या योजनेचा परिपूर्ण लाभ मिळावा व जेणेकरून लाभार्थी महिलांना या योजनेपासून वंचित रहावे लागू नये याकरिता कणकवली शहरातील या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांसाठी माझी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. कणकवली शहर भाजपच्या कार्यालयात हा कक्ष सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार असून, या ठिकाणी या लाभार्थ्यांना आवश्यक असणारे दाखले संबंधित प्राधिकरणाकडून घेऊन देण्यात येणार आहेत. शहरातील महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी हे पाऊल उचलल्याची माहिती माझी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. दरम्यान कणकवली शहरातील ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे या अशा महिलांनी कणकवली शहर भाजप कार्यालय कंझ्यूमर्स सोसायटी जवळ वरील दिलेल्या वेळेत आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, असेसमेंट व फोटो या कागदपत्रांसह उपस्थित राहत या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री नलावडे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!