कणकवली : मुख्यमंत्री “माझी बहीण” या योजनेसाठी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या पुढाकारातून कलमठ ग्रामपंचायत हॉल मध्ये उत्पन्न दाखल्यांसाठी ४ जुलै रोजी विशेष शिबिर होणार आहे. सकाळी ९:३० ते ५ पर्यंत शिबिर होणार असून, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सेतू मित्र, अंगणवाडी सेविका, मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी सहकार्यसाठी उपस्थित असणार आहेत.
कलमठ गावातील सर्व महिला भगिनींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांनी केले आहे.
यावेळी लाभार्थी महिलांनी येताना उत्पन्न दाखला साठी आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, असेसमेंट व फोटो घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.