9.6 C
New York
Thursday, October 16, 2025

Buy now

आचरा पोलीसांतर्फे नवीन कायद्याबाबत जनजागृती

आचरा : नवीन फौजदारी कायद्याची महिला युवक विद्यार्थी वरिष्ठ नागरिकांसह समाजातील इतर घटकांना माहिती व्हावी यासाठी आचरा पोलीस स्टेशन तर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या अंतर्गत आचरा तिठा येथे जनजागृती करण्यात आली.यावेळी आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम पडवळ यांनी उपस्थितांना माहिती पत्रक देत नवीन कायद्या बाबत माहिती दिली.यावेळी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, व्यापारी संघटनेचे विद्यानंद परब,रिक्षा व्यावसायिक माधव भोसले,दिपक घाडी,शैलेश राणे यांसह ग्रामस्थ सदानंद घाडी,भाऊ हडकर,रुपेश घाडी यांसह अन्य आदी उपस्थित होते. पोलीस हेड कॉन्स्टेबल पडवळ यांनी याबाबत जनजागृती केली याबद्दल माहिती देताना पडवळ यांनी देशात एक जुलैपासून जुने कायदे रद्द होऊन त्याची जागा नवीन तीन नव्या कायदे घेतली असल्याचे सांगून भारत दंड संहिता (१८६० )च्या बदल्यात भारतीय न्यायिक संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आयपीसी (१८९८) च्या बदल्यात भारतीय नागरिक संरक्षण संस्था आणि भारतीय पुरावा कायदा (१८७२) च्या बदल्यात भारतीय साक्ष अधिनियम हे कायदे लागू झाले असल्याची माहिती दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!