कणकवली : तालुका राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्या कणकवली गांगोमंदिरनजीक च्या घरात चोरीचा प्रयत्न करताना मध्यप्रदेश मधील एका महिलेला पकडण्यात आले. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रदीप मांजरेकर आपल्या घरी आले असता त्यांना घरालगत चोरीच्या उद्देशाने संशयास्पद अवस्थेत आढळली. तसेच पितळी समई आणि भांडी वगैरे साहित्य गायब झाल्याचे दिसून आले. संशयित मध्यप्रदेश मधील एका महिलेला मांजरेकर यांनी पकडून कणकवली पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी असा तक्रार अर्ज दिला. त्यानुसार पोलिसांकडून कारवाई करण्यात आली