22.3 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे कृषी दिन साजरा

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी तुळस गावच्या सरपंच सौ. रश्मी परब, उपसरपंच श्री सचिन नाईक, तुळस गावातील सेंद्रीय शेती करणारे 2 शेतकरी श्री. निलेश भगत, श्री संतोष शेटकर श्री शिवाजी हायस्कूल तुळस चे मुख्याध्यापक श्री. संदीप तुळसकर उपस्थित होते.

कृषी दिनानिमित्त कृषीदिंडीचे आयोजन करण्यात आले होते, विद्यार्थ्यांना वृक्षारोपणचे महत्व पटवून देवून आंबा, साग, सुरंगी, कैलासपती अशी विविध झाडे लावण्यात आली. कृषि दिनानिमित्त सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला नैसर्गिक शेतीचे व सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देण्यात आले.

सर्प मित्र तसेच रक्त मित्र श्री महेश राऊळ सरांनी साप कसा शेतकऱ्याचा मित्र आहे हे पटवून दिले व विविध सर्प प्रजातींची माहिती सांगितली. त्यांच्या मार्गर्शनामुळे विद्यार्थ्याच्या मनातून सापाची भिती कमी होण्यास मदत झाली.

श्री निलेश भगत यांनी सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून दिले. तसेच तुळस गावातील कृषीकन्यांनी नैसर्गिक शेती काळाची गरज व कडधान्य मिशन विषयी माहिती दिली. श्री शिवाजी हायस्कूल तुळस च्या विद्यार्थ्यानी हिरव्या रंगाचे कपडे घालून Green Day साजरा केला.आकर्षक अशी कृषि दिनानिगडीत रंगीत फलक तयार करून मोलाचे सहकार्य केले. अश्याप्रकारे तुळस येथील श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे कृषि दिन साजरा करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!