1.6 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

युवा उद्योजक अचित कदम यांच्या वतीने विजवीतरण लाईनमन ना रेनकोट वाटप

कणकवली : वरवडे गावचे सुपुत्र युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अचित कदम यांनी कान्हा मालंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विजवीतरण च्या कणकवली ग्रामीण विभाग मधील १६ लाईनमन ना मोफत रेनकोट वाटप केले.

यावेळी विजवीतरण चे अभियंता राणे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ता अचित कदम, कान्हा मालंडकर, सुभाष मालंडकर, इब्राहिम शेख, आनंद घाडी, काका कदम, सोहेल खान, सागर राणे, मंदार मेस्त्री, ओंकार कदम आदी उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी जोपासत अचित कदम यांनी आपला मित्र कान्हा मालंडकर यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. पावसाळ्यातही विशेष मेहनत घेत विजवीतरण चे लाईनमन वीजपुरवठा सुरळीत सुरू राहावं यासाठी खडतर मेहनत घेत असतात.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!