28.3 C
New York
Thursday, July 25, 2024

Buy now

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे विद्यार्थी सत्कार समारंभ व मोफत वह्या वितरण समारंभाचा शुभारंभ

कणकवली : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व मोफत वह्या वितरण समारंभाचा शुभारंभ माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे संपन्न झाला. यावेळी युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्यावतीने इयत्ता दहावी व बारावी या इयत्तेमधील प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या एकूण १५ विद्यार्थ्यांना सुमारे ६००० किमतीचे डिजिटल वॉच देऊन युवा संदेश प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत तसेच युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

प्रतिवर्षाप्रमाणे कनेडी हायस्कूलमधील ६५० विद्यार्थ्यांना प्रत्येकी यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

संदेश सावंत यांनी दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. भविष्यामध्ये यापेक्षाही चांगला अभ्यास करून आपल्या कनेडी हायस्कूलचे नाव आपल्या पालक शिक्षकांचे नाव उज्वल करावे यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतमध्ये युवसंदेश प्रतिष्ठान च्या सर्व उपक्रमांचे मुक्तकंठाने प्रशंसा केली.

कार्यक्रम प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्षा संजना सावंत, ग्रामपंचायत सांगवेचे सरपंच संजयजी सावंत, उपसरपंच प्रफुल काणेकर, सांगवे माजी सरपंच विजय भोगटे, ग्रामपंचायत सदस्य राजेश साबळे, अशोकजी कांबळे, सुरेश सावंत, दिगवळे सरपंच संतोष गावकर, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, दीपक नांदगावकर, विनय सावंत, रॉबर्ट डिसोजा, संजय सावंत, प्रदीप सावंत, कनेडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुमन दळवी, श्री. बुरान तसेच सर प्रशाळेतील सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक सुमन दळवी यांनी केले. कार्यक्रमाची सूत्रसंचालन सह आभार प्रदर्शन प्रसाद मसुरकर सर यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!