13 C
New York
Sunday, October 13, 2024

Buy now

गावातील शाळेच्या छप्पर दुरुस्तीला निधी न मिळणे हे दुर्दैव ; राजेश गावकर

मालवण : कांदळगाव हे आपले गाव म्हणून नारायण राणे सांगत असतात. मग याच गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छप्पर दुरुस्तीच्या कामाला जिल्हा परिषदेत, राज्यात त्यांची सत्ता असताना तसेच भाजपचे पालकमंत्री असताना निधी उपलब्ध करून देऊ शकत नाहीत ही दुर्दैवाची गोष्ट आहे अशी टीका उबाठा गटाचे कांदळगाव विभागप्रमुख राजेश गावकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे. पत्रकात म्हटले आहे की, कांदळगाव येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनच्या छप्पर दुरुस्तीचा कामाचा प्रस्ताव गतवर्षी शिक्षण विभागामार्फत पाठविण्यात आला होता. मात्र या गावातील ग्रामपंचायत ही शिवसेनेच्या ताब्यात असल्यानेच सत्ताधाऱ्यांनी जाणूनबुजून छप्पर दुरुस्तीच्या कामाला निधी उपलब्ध करून दिला नाही. प्रशालेचे छप्पर शाळेच्या पहिल्याच दिवशी कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात एकही मुलगा जखमी झाला नाही. जर एखाद्यप्रसंगी छप्पर कोसळून जीवितहानी झाली असती तर हेच सत्ताधारी याठिकाणी आर्थिक मदत करण्यासाठी आले असते. मात्र गेलेले प्राण वाचवू शकले नसते. भाजपचे नेते निलेश राणे यांनी या प्रशालेला भेट देत पाहणी केली. त्यानंतर आजपासून त्यांनी स्वखर्चातून कामाला सुरुवात केल्याचे कळते. यावरून सत्ता असूनही छप्पर दुरुस्तीच्या कामाला ते निधी उपलब्ध करून देऊ शकले नसल्याचे तसेच सत्ताधाऱ्यांचे, पालकमंत्र्यांचे, शिक्षणमंत्र्यांचे अपयश झाकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत असल्याचे दिसून येत आहे अशी टीकाही श्री. गावकर यांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!