गडहिंग्लज येथील पर्यटक जंगलात पळाले
आंबोली : गाडीला बाजू देण्याच्या रागातून गडहिंग्लज येथील पर्यटक आणि सावंतवाडी बांद्यातील पर्यटक यांच्यात जोरदार धुमश्चक्री उडाली. यावेळी आपल्याला मारहाण होईल या भीतीने त्यातील काही पर्यटक थेट आंबोलीच्या जंगलात पळून गेले. ही घटना आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास येथील घाटात घडली. याबाबत दोन्ही गटांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. मात्र अद्याप पर्यंत काही दाखल नाही, अशी माहिती हवालदार आबा पिळणकर यांनी दिली. आंबोली घाटात आज नेहमीप्रमाणे पर्यटकांची गर्दी झाली होती. त्यात रस्त्याचाया बाजूला गाड्या पार्क करण्यात आल्यामुळे ट्राफिक जाम झाले होते. त्यामुळे गाडीला बाजू देण्याच्या कारणावरून हा वाद निर्माण झाला यातून गडहिंग्लज येथील पर्यटकांनी एकाला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. यावेळी त्यांने आपल्या समवेत असलेल्या अन्य ३५ ते ४० सहकाऱ्यांना बोलावले. त्यानंतर पुन्हा त्याच्यात जोरदार धुमश्चक्री उडाली. यावेळी आपल्याला मारहाण होईल या भीतीने गडहिंग्लज येथील त्या पर्यटकांनी थेट जंगलात पलायन केले. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या त्याच्या अन्य काही सहकार्याने पोलीस ठाण्यात धाव घेऊन स्थानिक पोलिसांना कल्पना दिली. त्यानुसार त्यांची शोधा शोध घेण्याचे काम सुरू होते. दोन्ही गट पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. परंतु उशिरापर्यंत याप्रकरणी काहीच दाखल झाले नव्हते. याबाबत श्री. पिरणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. परंतु चौकशी सुरू असून अद्याप पर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. संबंधित पळून गेलेले पर्यटक हे गडहिंग्लज येथील आहेत तर मारहाण करणारे पर्यटन हे सावंतवाडी बांदा भागातील आहेत. ते थार गाड्या घेऊन “ऑफरोडींग” करण्यासाठी या ठिकाणी आले होते. गाडीला बाजू देण्यावरून त्यांच्यात वाद झाला.