0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

रत्नागिरी सिंधुदुर्गातील बॅनरबाजीवर आ. राणेंची प्रतिक्रिया

प्रत्येक पक्षात अतिउत्साही कार्यकर्ते असतात तर ; शिवसेना ( शिंदेगटात ) उबाठा प्रेमी घुसल्याची टीका

सामंत आणि राणेंमध्ये भांडण लावण्याचा बॅनरबाजीतून प्रयत्न

नावसाहित वरिष्ठांना कळविले असल्याचेही केले स्पष्ट

कणकवली | मयुर ठाकूर : प्रत्येक पक्षात अतिउत्साही कार्यकर्ते असतात. त्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचा बॅनर वॉर सुरू केला असेल तर त्याबद्दलची दखल दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ मंडळांनी घेतलेळू आहे. आम्हाला कळवलेल आहे कि यापुढे सिंधुदुर्गाच्या संदर्भात काही विषय असेल शिवसेना ( शिंदेगट ) यासंदर्भात आम्ही दीपक केसरकर यांच्याशी बोलावं अस सांगितलेलं आहे. याबाबत सर्व दखल दीपक केसरकर घेत असल्याने त्याबद्दल आम्ही त्यांच्याशी बोलू. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सिंधुदुर्ग रत्नागिरीत काही शिवसेनेत काही उबाठा प्रेमी घुसलेले आहेत. ज्यांना आमच्या सगळ्यांमध्ये युती होऊ नये अशी सुपारी घेतलेली आहे. यासाठी मुद्दामहून बॅनर लावण्याच काम करतात. तसेच सामंत आणि राणेंमध्ये भांडण लावण्याचा काम करतात. तर वेळेत या उबाठा प्रेमी शिवसेनेत घुसलेले आहेत त्यांना तुम्ही दूर करावं असे नावासकट यादी आम्ही दीपक केसरकर यांच्याकडे पाठवलेली आहे. ते योग्य पद्धतीने दखल घेतील. आणि येणाऱ्या निवडणुका आम्ही ताकतीने महायुती म्हणूनच लढू या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आहे, असेही ते म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!