28.3 C
New York
Thursday, July 25, 2024

Buy now

कर्ली खाडीपात्रात अनधिकृत वाळू उपसा

खाडीत उतरून आंदोलनाचा इशारा ; महसूल प्रशासनाचा दुर्लक्ष

मालवण : देवली वाघवणे कर्ली नदी येथील डी- ५ या वाळू पट्ट्यामध्ये वाळू लिलाव जाहीर झालेला नसतानाही सध्या दिवसाढवळ्या बेसुमार वाळू चोरी सुरू आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. अनधिकृत वाळू उपसा कायमस्वरूपी बंद करावा अन्यथा ग्रामस्थ खाडीत उतरून आंदोलन करतील असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी तहसीलदार वर्षा झालटे यांना दिला आहे. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी त्यांना सादर केले आहे. तालुक्यातील देवली वाघवणे कर्ली नदीपात्रात डी-५ या वाळूपट्ट्यात वाळू उपसा जाहीर झालेला नसतानाही सध्या दिवसाढवळ्या अनधिकृतरित्या बेसुमार वाळूचा उपसा सुरू आहे. या वाळू चोरीमुळे लगतच्या शेतीस, माडबागायतीस धोका निर्माण झाला आहे. वाळू उत्खननामुळे खार बंधारा खचून गेला आहे. त्यामुळे लोकवस्तीसही धोका निर्माण झाला आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या वाळू उपशाकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तरी हे अनधिकृत वाळू उत्खनन कायमस्वरूपी बंद करावे. संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थ स्वतः खाडीमध्ये उतरून अनधिकृत वाळू उत्खननास विरोध करतील. हे करत असताना काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असेही ग्रामस्थांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. या निवेदनावर विरेश मांजरेकर, महेश चव्हाण, प्रकाश मांजरेकर, रावजी मांजरेकर, हेमंत चव्हाण, शोभा आचरेकर, विजय आचरेकर, बापूजी चव्हाण, जगन्नाथ मांजरेकर, वैशाली चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!