22.3 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

कुडाळ मालवण महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

कुडाळ : रविवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने कुडाळ – मालवण मागविर भलेमठि झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाने आज दुपारी आपले अस्तित्व दाखवून दिले. जवळपास दीड ते दोन तास कोसळलेल्या या मुसळधार पावसामुळे कुडाळ मालवण मार्गावर औदुंबर नगर येथे पिंपळाचे भलेमोठे झाड मार्गावर कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. कुडाळ आणि मालवण तालुक्यांना जोडणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरू असते. परंतु कुडाळ औदुंबर नगर येथील पिंपळाचे भले मोठे झाड मार्गावर कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!