8.7 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

तृतीयपंथीयांच्या वेशात फिरणाऱ्या तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरात तृतीयपंथीयाच्या वेशात फिरणाऱ्या तिघा तरुणांना सावंतवाडी पोलिसांनी सोमवारी अखेर ताब्यात घेतले. या व्यक्तींकडून नागरीकांच्या घरात घुसून, भिती घालून, पैशाची मागणी करणे, लोकांना त्रास देणे असे प्रकार सुरू होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पोलिसांकडे केली होती.

त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, रात्री उशिरा पर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. या सर्व व्यक्ती मूळ अकोला येथील असून सध्या कुडाळ येथे राहत होत्या, अशी माहिती सावंतवाडी पोलिसांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, ताब्यात घेण्यात आलेले संबंधित तरुण तृतीयपंथीचा वेश परिधान करून शहरात फिरत होते. मात्र, पैसे मागताना थेट नागरिकांच्या घरात घुसणे, मोठ्या रक्कमेची मागणी करणे, धमक्या देणे असे प्रकार त्यांच्याकडून सुरू होते. गेले दोन ते तीन दिवस हा प्रकार सुरू होता. त्यामुळे याबाबतच्या तक्रारी अनेक नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, सोमवारी दुपारी शहरातील सबनिसवाडा परिसरात हे तिघे जण फिरत असल्याची माहिती काही लोकांनी श्री. साळगावकर यांना दिली. त्यानु‌सार त्यांनी याकडे पोलिसांचे लक्ष वेधले त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. ते तिघेही मूळ अकोला येथील असून सद्यस्थितीत कुडाळ येथे राहतात. त्या ठिकाणी तृतीयपंथींचा वेश परिधान करून ते जिल्ह्यात फिरतात, अशी त्यांच्याकडून माहिती मिळाली. मात्र, उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!