18.9 C
New York
Wednesday, April 30, 2025

Buy now

वेंगुर्ले येथील भाजी विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप

वेंगुर्ले : भाजपच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याचा फायदा करून पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या योजना तळागाळात पोहोचण्यासाठी आपले प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास भाजप युवा नेते विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केला. श्री. परब यांच्या माध्यमातून आज वेंगुर्ले बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जनसामान्यांसाठी काम करत आहे आणि यापुढे ही करणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रसन्ना देसाई, ॲड.अनिल निरवडेकर, बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडिस, पप्पू परब, सुहास गवंडळकर, सोमा मिस्त्री, सत्यवान परब, धर्मराज कांबळी, वामन गावडे, सत्याविजय गावडे, शेखर काणेकर, प्रभाकर गावडे, सचिन गावडे, संदेश गावडे, वैभव दोडावडेकर, साईप्रसाद नाईक, प्रफुल्ल प्रभू, श्रीकांत राजाध्यक्ष, प्रसाद नाईक, नारायण कुंभार, प्रशांत खानोलकर, सत्यवान पालव, अजित कणयाळकर, व्यापारी, स्थानिक ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!