29.7 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

ग्राहक पंचायत संस्था करणार गुणवंतांचा सत्कार

कणकवली : ग्राहक पंचायतीच्या कणकवली शाखेची बैठक नगरपंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृहात पार पडली. यात दहावी व बारावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे ठरले. याशिवाय ग्राहक पंचायतीच्या कणकवली शाखा, ज्येष्ठ नागरिक संघ, पेन्शनर असोसिएशन कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १६ जूनला कार्यक्रम घेण्याचा ठरविले.

बैठकीला ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक सीताराम कुडतरकर, अध्यक्षा श्रद्धा कदम, सचिव पूजा सावंत, उपाध्यक्षा गितांजली कामत, जिल्हा महिला प्रतिनिधी रिमा, भोसले, सल्लागार मनोहर पालयेकर, संघटक विनायक पाताडे, सहसंघटक सुभाष राणे, प्रकाश वाळके, सदस्य राजन भोसले, आयशा सय्यद, विलास चव्हाण आदी उपस्थित होते.

बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर कणकवली शाखेच्या कोषाध्यक्षपदी सुभाष राणे, संघटकपदी जे. जे. शेळके, सहसंघटकपदी राजन भोसले, सदस्यपदी विलास चव्हाण यांची निवड करण्यात आली. यावेळी श्रद्धा कदम यांनी संघटनेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!