29.7 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

खारेपाटण चेक पोस्टवर कणकवली पोलिसांची धडक कारवाई ; बंदूक व १७ काडतुसे जप्त

कणकवली : खारेपाटणहून राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या बलेनो कारची तपासणी करण्यात आली. शिकारीच्या उद्देशाने जात असताना सोबत काडतुसच्या बंदुकीसहित जिवंत काडतुसे घेऊन जाणाऱ्या देवगड मधील पाच जणांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

याबाबत कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खारेपाटण चेक पोस्ट या ठिकाणी संशयित आरोपी बलेनो कारमधून देवगडहुन राजापूरच्या दिशेने जात असताना या गाडीची तपासणी करण्यात आली. यावेळी या गाडीमध्ये संशयित आरोपी जितेंद्र बाबाजी पाळेकर ( वय – ४० रा. मुटाट पाळेकरवाडी तालुका देवगड) गोपाळ लक्ष्मण पाळेकर ( वय – ५४, रा. मुटाट पाळेकरवाडी ता. देवगड ) विसंगत विश्वास साळुंखे ( वय ३१ वर्ष रा. मुटाट बौद्धवाडी ता. देवगड ), विनोद राजाराम साळुंखे (वय ३६ रा. मुटाट बौद्धवाडी ता. देवगड ), संतोष सखाराम पाळेकर ( वय ५० वर्ष रा. मुटाट पाळेकरवाडी ता. देवगड ) हे सर्वजण विनापरवाना काडतुस ची बंदूक घेऊन शिकारीच्या उद्देशाने जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.

संशयित आरोपींकडून २०,००० रुपये किंमतीची बंदूक, ५ शक्तिमान कंपनीची व १२ एक्सप्रेस कंपनीची २ हजार रुपये किमतीचे जिवंत काडतुसे, ७०० रुपयाची हेडलाईट, आकाशी रंगाचे कव्हर व बलेनो कार ६ लाख असा एकूण ६ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या

मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे, कॉन्स्टेबल नितीन बनसोडे, विनोद चव्हाण व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत

मयुर ठाकूर | कणकवली

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!