26.4 C
New York
Saturday, September 14, 2024

Buy now

मालवण तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.३९%

तालुक्यात टोपीवालाचा कैवल्य मिसाळ प्रथम ; देवदत्त गावडे द्वितीय तर दीप कोकरे तृतीय

मालवण : मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावीचा तालुक्याचा निकाल ९९.३९ टक्के एवढा लागला आहे. यात टोपीवाला हायस्कूलचा विद्यार्थी कैवल्य मिसाळ ९९.४० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम, कट्टा येथील वराडकर हायस्कूलचा देवदत्त गावडे ९८.४० टक्के गुण मिळवून द्वितीय तर टोपीवाला हायस्कूलचा दीप कोकरे हा ९७.६० टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे. तालुक्यात ९९० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ४४९ जणांनी विशेष श्रेणी प्राप्त केली आहे. तर ३८९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १२३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २३ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील ३५ पैकी ३१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळा निहाय निकाल असा- अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलचा निकाल ९८.२७ टक्के लागला आहे. यात तृतीय- आर्यन देविदास प्रभुगावकर ९५.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. संस्थाध्यक्ष शरद परुळेकर, विजय कामत, दत्तप्रसाद खानोलकर, मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू यांनी अभिनंदन केले. जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात प्रथम- आर्य मकरंद कुलकर्णी ९७.२० टक्के, द्वितीय हर्षदा सदाशिव गवस ९२.८० टक्के, तृतीय ऋतु तुषार गावडे ८९ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष शरद परुळेकर, विजय कामत, सदस्य तसेय मुख्याध्यापिका तेजल वेंगुर्लेकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. रोझरी इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात प्रथम- वैष्णवी मंगेश खोत ९५.६० टक्के, द्वितीय- शुभ्रा युगलकिशोर प्रभुगावकर, स्मित प्रसन्नकुमार मयेकर ९३.६० टक्के, तृतीय- आर्या रमण पाटील ९१.६० टक्के विशेष श्रेणीत ३८, प्रथम श्रेणीत २४ तर द्वितीय श्रेणीत ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक वॉल्वीन घोन्सालवीस, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात प्रथम- क्रीसा नरसिंह पटेल ८२.२० टक्के, द्वितीय- आयुष निलेश मोरये ७७.८० टक्के, तृतीय- प्राजक्ता सत्यवान सावंत ६७.८० टक्के, संस्थाचालक, मुख्याध्यापक नंदिनी साटलकर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणीचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेतून युवराज रमेश साळकर याने ८३ टक्के गुण मिळवून प्रशालेतून प्रथम येण्याचा मान मिळविला. मंथन उदयचंद्र नाईक ८२.२० गुण मिळवून द्वितीय तर वैष्णवी पांडूरंग सावंत ८०.४० टक्के गुण मिळवून तृतीय आली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाघालक, मुख्याध्यापक शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. आर. ए. यादव हायस्कूल आडवलीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेत सोनम संदिप घाडीगावकर हिने ८५.२० टक्के गुण मिळवून प्रशालेतून प्रथम येण्याचा मान मिळविला. द्वितीय- वृत्तीका नरेंद्र लाड ८१.२० टक्के तर तृतीय- हर्षदा राजन मालंडकर ७९.६० टक्के हिने पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक शिक्षकांनी अभिनंदन केले. सर्वोदय एज्युकेशन सोसासटी अध्यक्ष, सदस्य व पदाधिकारी, शाळा समिती अध्यक्ष सदस्य, मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. माध्यमिक शालांत परीक्षेत जनता विद्यामंदिर त्रिंबकचा निकाल १०० टक्के लागला आहे. एकूण ३१ विद्यार्थी प्रशालेतून परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी स्वराली एकनाथ गायकवाड ही ९१.४० टक्के गुण मिळवून प्रथम, प्रथमेश राजेंद्र पुजारे ८९.६० टक्के गुण मिळवून द्वितीय, हर्ष प्रवीण घाडीगावकर ८६.८० टक्के गुण मिळून तृतीय, आर्यन उमेश घाडीगावकर ८४ टक्के गुण मिळवून चतुर्थ, तर हार्दिक आनंद परब ८३.४० टक्के गुण मिळवून पाचवा आला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, अशोक बागवे, अरुण घाडी त्याचप्रमाणे सर्व माध्यमिक शिक्षक कार्यकारीणी तसेच मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर व सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित माध्यमिक शालांत परीक्षेत नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडियम स्कुल आचराचा निकाल १०० टक्के लागला आहे. या प्रशालेतून २५ विद्यार्थी परीक्षेत बसले होते ते सर्वजण उत्तीर्ण झाले असून १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. प्रथम- मृणाल धवल फाटक ९१.४० टक्के, द्वितीय- पारस मंदार सांबारी ९०.४० टक्के, तृतीय- सनवी संतोष परब ९० टक्के. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदिप मिराशी, प्रदिप परब मिराशी, अशोक पाडावे, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष निलेश सरजोशी, परेश सावत, सदस्य मदार सांबारी, सुरेश गांवकर, दिलीप कावले, मुख्याध्यापिका मायलीन फर्नाडिस यांनी अभिनंदन केले आहे. आचरा येथील श्री रामेश्वर विद्यामंदिर आचरा पिरावाडी हायस्कूलचे दहावी परीक्षेस बसलेले सर्वच्या सर्व विद्यार्थी पास होऊन निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम- पार्थ सुभाष पाटील ५६.४० टक्के, द्वितीय- अफजल मुनव्वर अली शाह ५३.८० टक्के, तृतीय- मोहम्मदमिझान शादाब मुकादम ४६.८० टक्के प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे स्कूल कमेटी सदस्य पदाधिकारी मुख्याध्यापक, शिक्षक पालक यांनी अभिनंदन केले आहे. धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित माध्यमिक शालांत परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल आचराने घवघवीत यश संपादन करत १०० टक्के निकाल लागला आहे. या प्रशालेतून एकूण ७२ विद्यार्थी परीक्षेत बसले होते ते सर्वजण उत्तीर्ण झाले असून १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यात प्रथम- स्वराली मारुती आचरेकर हिने ९७.२० टक्के,द्वितीय- इशा सचिन रिसबूड ९६ टक्के, तृतीय- राकेश चंद्रकांत देसाई ९५.६० टक्के, चतुर्थ खुशी संदिप पालव ९१ टक्के गुण मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदिप मिराशी, प्रदिप परब मिराशी, अशोक पाडावे, स्थानिक स्कूल कमिटीच्या निलिमा सावंत, राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर, बाबाजी भिसळे, रघुनाथ पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटूकडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी अभिनंदन केले आहे. डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबागचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम- श्रेया श्रीधर खराडे ८२.६० टक्के, द्वितीय- कुमारी प्रणिता हेमंत राणे ८१.८० टक्के आणि तृतीय- कुमार यज्ञेश हेमंत कांदळगावकर ७८.६० टक्के, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका रचना रुपेश खोबरेकर सर्व संस्था चालक, सर्व शिक्षक शिक्षकेतर, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले आहे. ओझर विद्यामंदिर कांदळगावचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम- वैभवी महेश परब ८९.८० टक्के, द्वितीय- रिया संतोष कांदळगावकर ८६ टक्के, तृतीय- प्रतीक्षा दामाजी सुर्वे ८४.६० टक्के मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक दिपक जाधव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाटचा निकाल १०० टक्के लागक आहे. प्रथम- विराज दशरथ परब ८४.२० टक्के, द्वितीय- सेजल बाळकृष्ण भांडे ८२.४० टक्के तृतीय- दर्पण हेमंत हडकर ८१.६० टक्के गुण मिळूवन यशस्वी झाले आहेत. मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी अभिनंदन केले आहे. माता काशीबाई महादेव परब मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, मसुरे संचलित भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल, मसुरेचा दहावीचा निकाल सलग पाचव्या वर्षी १०० टक्के लागला आहे. बाबुराव समीर परब ९० टक्के, वरद सतीश वाळके ८६.४० टक्के, अच्युत अजय प्रभूगावकर ८५ टक्के यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. विशेष योग्यता श्रेणीत ६, प्रथम श्रेणीत ४, द्वितीय श्रेणीत २ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. या प्रशालेचा बाबुराव परब हा विद्यार्थी मसुरे केंद्रात प्रथम आला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष प्रकाश परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, संस्था पदाधिकारी डॉ. अनिरुद्ध मेहेंदळे, अशोक मसुरेकर, बाबाजी भोगले, किशोर देऊलकर, मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर, सुनील परब, कमिटी सदस्य, सर्व शिक्षक वर्ग, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ पालकांनी अभिनंदन केले आहे. माध्यमिक विद्यालय बिळवसचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रथम- संजना प्रदिप हळवे ८५.२० टक्के, द्वितीय- वैभवी विलास गावडे ८२.६० टक्के, तृतीय- साक्षी संतोष पालव ८९.४० टक्के यांनी यश प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सुर्यकांत पालव, अशोक पालव, मुख्याध्यापक जयवंत ठाकूर बिळवस सरपंच मानसी पालव, तसेच सर्व संस्था पदाधिकारी, सर्व शाळा समिती सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, ग्रामस्थ, पालकांनी अभिनंदन केले आहे. मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल या प्रशालेचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये वैष्णवी दत्ताराम सावंत ८९. टक्के, पियुष संजय भोगले ८८.४० टक्के, चेतन अनिल दूखंडे ७७.४० टक्के यांनी प्रशालेमध्ये क्रमांक प्राप्त केले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ. दीपक परब, उत्तम राणे, नारायण सावंत, लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे, शाळा समिती अध्यक्ष सरोज परब, प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापिका अर्चना कोदे, संस्था सदस्य दत्तप्रसाद पेडणेकर, सर्व कमिटी सदस्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे. मसुरे देऊळवाडा भरतगड हायस्कूल नंबर दोन या प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये जागृती नार्वेकर ७३.८० टक्के, साक्षी नारायण वंजारे ७२.६० टक्के सायली गुरुदास परब ६९ टक्के यांनी अनुक्रमे क्रमांक प्राप्त केले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ. दीपक परब, उत्तम राणे, नारायण सावंत, महेश बागवे, सोनोपंत बागवे, विठ्ठल लाकम, विलास मेस्त्री, अशोक बागवे, दिलीप मसुरकर प्रशालेचे मुख्याध्यापक एस.आर. कांबळे, सर्व कमिटी सदस्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व संस्था पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे. वराडकर हायस्कूल कट्टाचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम- देवदत्त धनंजय गावडे ९८.४० टक्के, द्वितीय- आत्माराम गुरुप्रकाश म्हाडगुत ९७.४० टक्के, तृतीय- सुजल सिताराम परब, रिया विशेष भगत – ९६.६० टक्के यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, अॅड एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, आनंद वराडकर, शेखर पेणकर, सुनिल नाईक, विजयश्री देसाई, साबाजी गावडे, रविंद्रनाथ पावसकर, अन्य संचालक, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, मुख्याध्यापक संजय नाईक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम- प्राची राजेश परुळेकर ८९.२० टक्के, द्वितीय- तन्मय प्रमोद परब ८८.८० टक्के, तृतीय- आर्या आनंद टेमकर ८६ टक्के, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, अँड एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, आनंद वराडकर, शेखर पेणकर, सुनिल नाईक, विजयश्री देसाई, साबाजी गावडे, रविंद्रनाथ पावसकर, अन्य संचालक, सुधीर वराडकर, मुख्याध्यापक ऋषीकेश नाईक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. प्रगत विद्यामंदिर रामगडचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात प्रथम- वैष्णवी नारायण जिकमडे ९५.८० टक्के, द्वितीय- दिव्या अनंत सावंत ९२.८० टक्के, तृतीय- सुवर्णा हेमंतकुमार तारी ९२.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष वा. स. प्रभुदेसाई, श्री. तळवडेकर, वि. म. मटकर, स. सि. वाघ, सर्व संचालक, मुख्याध्यापक ए. एम. वळंजु सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. सौ. इं. द. वर्दम हायस्कूल पोईप विरणचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम – खुशी जितेंद्र परब ९३.६० टक्के, द्वितीय- वीणा राजन खोत ९२.८० टक्के, तृतीय- मानसी घाडीगावकर ८९.८० टवके. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अनिल कांदळकर, विलास माधव, गोपीनाथ पालव सर्व संचालक, मुख्याध्यापक विकास कुंभार, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरीचा निकाल ९२.५९ टक्के लागला आहे. प्रथम – जागृती उल्हास परकर ८२.८० टक्के, द्वितीय- सानिका मेस्त्री ८०.८० टक्के, तृतीय- सिध्दी महादेव देउलकर ७८.८० टक्के यशस्वी विद्यार्थ्यांचे डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव स्वप्नीक फाटक, स्कुल कमिटी चेअरमन संतोष गावकर, सदस्य भगवान लुडबे, चंद्रकांत चव्हाण, मुख्याध्यापक सुहास हिंदळेककर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे. चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय चौके विद्यालयाचा सन २०२३-२४ माध्यमिक शालांत परीक्षा निकाल शंभर टक्के लागला. यावर्षी एकूण ४३ विद्यार्थी परीक्षेसाठी समाविष्ट झाले होते. प्रथम- उन्नति कृष्णा परब ८७ टक्के, द्वितीय- भार्गवी रमेश पाटकर आणि जय विश्वनाथ चव्हाण-८६ टक्के, तृतीय- ओमकार विजय चव्हाण ८५.६० टक्के सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चौके स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे, मुख्याध्यापिका रसिका गोसावी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम- विशाल विलास घाडीगावकर ८५.६० टक्के, द्वितीय- साहिल रामचंद्र घाडीगांवकर ८५.४० टक्के, तृतीय- मयूर वासुदेव घाडीगावकर ८५ टक्के, संस्थाध्यक्ष बाबू बाणे सर्व संचालक, मुख्याध्यापक वामन तर्फे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात प्रथम- गायत्री सावंत ९० टक्के, द्वितीय- विनायक चव्हाण ८५.२० टक्के, तृतीय- हर्ष चव्हाण ७९.६० टक्के. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष विजय सावंत, सचिव प्रकाश सावंत, सर्व संचालक मंडळ सदस्य, मुख्याध्यापक सुशांत पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. अॅङ गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कुल माळगावचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात प्रथम – दुर्वेश बापू राणे ८६ टक्के, द्वितीय- संजीत संजय परब ७९.४० टक्के, तृतीय- प्रसाद नरेश शेलार ७७.४० टक्के गुण मिळवले आहेत. अध्यक्ष डॉ. संजय खोत, रुक्मिणी महाजन, अरुण भोगले, मुख्याध्यापक उदय जोशी, सहाशिक्षक, कर्मचारी, संचालक यांनी अभिनंदन केले आहे. ल. टो. कन्याशाळा मालवणचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात प्रथम- मयुर रमेश कानोजे ८८ टक्के, द्वितीय – साक्षी कांदळगावकर ८४.८० टक्के, तृतीय – सौरभ महेद्र सुर्वे – ७९.४० टक्के. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, गणेश कुशे, विजय केनवडेकर, डॉ. शशिकांत झाटये, शालेय समिती अध्यक्ष संदेश कोयंडे, साईनाथ चव्हाण व मुख्याध्यापक शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!