24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

कणकवली तालुक्यात सेंट उर्सुलाची निधी सावंत १००% गुण मिळवून प्रथम

फोंडाघाट हायस्कूलची गायत्री राठोड, मानसी नानचे अनुक्रमे दुसरी व तिसरी

कणकवली | मयुर ठाकूर: कणकवली तालुक्यातील २३ हायस्कूलचा दहावी बोर्डाचा निकाल १०० टक्के लागला. वरवडे येथील सेंट उर्सुला हायस्कूलची निधी प्रकाश सावंत हिने १०० टक्के गुण मिळवुन बोर्डात प्रथम येण्याचा मान मिळवला. तर फोंडाघाट हायस्कूलच्या गायत्री विजयकुमार राठोड हिने(४९६) ९९.२० टक्के गुण मिळवुन तालुक्यात दुसरा क्रमांक मिळविला. तर याच हायस्कूलची मानसी राजन नानचे हिने(४९३) गुण ९८.६० टक्के मिळवुन तालुक्यात तिसरा क्रमांक मिळविला.

सेंट उर्सुला वरवडे या प्रशालेच निकाल १००% लागला असून प्रशालेत निधी प्रकाश सावंत हिने १००%गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर अदिती दामोदर खानोलकर ९७.८% व अदिती रमेश ठाणेकर यांनी ९७.४% गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

एस. एम. हायस्कूल कणकवली या प्रशालेचा निकाल ९८.३०% लागला असून पूर्वा माधव प्रभूदेसाई हिने प्रशालेत ९७.८०%गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर सोहम राजन मर्गज ९७.६०% व भावना मनोजकुमार निग्रे यांनी ९७.२०% गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

न्यू इंग्लिश स्कुल कळसुली या प्रशालेचा निकाल १००% लागला असून प्राची प्रमोद दळवी हिने प्रशालेत ९४.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर तन्वी संतोष राऊळ ९३% व अजिंक्य संजय सुतार यांनी ९२.२०% गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
नॅशनल इंग्लिश स्कूल नडगिवे या प्रशालेचा निकाल १००% लागला असून महावीश मुल्ला याने प्रशालेत ९४.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर निल लोकरे ९३% व झोया पटेल यांनी ९२.८०% गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी ( इंग्रजी माध्यम ) या प्रशालेचा निकाल १००% लागला असून प्राजक्ता न्यानेश्वर गोडसे हिने प्रशालेत ९५.४०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर यश रेशमा मेस्त्री ९०.८०% व हेमंत वामन मेस्त्री यांनी ९२.२०% गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. याप्रशालेतील एकूण ५ परीक्षार्थी माध्यमिक शालांत परीक्षेत प्रविष्ट झाले होते, पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर याच प्रशालेचा मराठी माध्यम चा निकाल १००% लागला असून हर्ष सर्जेराव कुंभार याने ८२% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर गणेश अनंत गावकर ७७.८०% व प्रवीण संदीप सावंत यांनी ७२.४०% गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

माध्यमिक विद्यालय कासार्डे या प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ९९.१९% लागला असून अथर्व अवधूत घुले याने ९३.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर प्रतीक संजय बिळसकर ९२.८०% व अमूल्य जयप्रकाश परब यांनी ९२% गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.

नरडवे इंग्लिश स्कूल या प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १००% लागला असून वृषाली गणेश ढवळ ८९.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर मनश्री बाळकृष्ण मयेकर ८८.२०% व सानिका संतोष सावंत यांनी ८३.२०% गुण मिळवून व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. या प्रशालेतून एकूण २९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

समता सेवा संघ मुंबई संचलित, लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय हरकुल बुद्रुक याप्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १००% लागला असून प्रतीक्षा संजय पाटील ९२.८०% प्रथम तर आर्या संजय परब ८६.८०% व शुभदा उदय परब यांनी ८२.२०% गुण प्राप्त करून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे या प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १००% लागला असून दिया जयराम प्रभूदेसाई, गौरेश आनंद पारकर यांनी ९६.४०% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला व मयुरेश श्याम सोनुर्लेकर ९५% व शार्दूल निलेश ठाकूर ९४% गुण प्राप्त करून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

माध्यमिक विद्यालय नाटक या प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १००% लागला असून दुर्वांगी दयानंद घाडीगावकर हिने ८८.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला तर साक्षी निलेश सावंत ८७.४०% व शैली चंद्रशेखर नेवाळकर ८५.८०% गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले आहेत.

शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण चा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून ऋतुजा मनोज करंदीकर हिने ९३.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर साची सचिन पारकर ९३.४०% व दुर्वेश प्रकाश नानिवडेकर याने ९०.८०% गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. या प्रशालेतून एकूण ८३ विद्यार्थी परीक्षेकरिता प्रविष्ट झाले होते, पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १००% लागला असून ऋतुजा रवींद्र परब हिने ९५% गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर तन्वी महेश करंगुटकर ९४.२०% व सृष्टी विद्याधर तांबे हिने ९३.८०%गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. प्रशालेतून एकूण २२ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यामंदिर हरकुळ खुर्द या प्रशालेत प्राजक्ता आत्माराम तेली ९०% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. व सेजल सुहास रासम ८७.४०% तर सानिया सूर्यकांत चव्हाण ८३% टक्के गुण प्राप्त करून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट या प्रशालेचा निकाल १००% टक्के लागला असून गायत्री विजयकुमार राठोड हिने ९९.२०% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर मानसी राजन नानचे ९८.६०% व चिन्मय राजन चिके हिने ९८.२०% गुण प्राप्त करून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर प्रशालेतील एकूण ९५ विद्यार्थी परीक्षेकरिता प्रविष्ट झाले होते. पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

बाल शिवाजी इंग्लिश स्कूल या प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रणाली किसन ठोंबरे ९६.८०% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर दूर्वा नागेश मुसळे ९४.४०% व खुशी हुक्माराम प्रजापत याने ९०% गुण प्राप्त करून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
अंजुमन इ खुद्दामूल मुस्लिमेन हायस्कूल हरकुळ बुद्रुक या प्रशालेचा निकाल १००% टक्के लागला असून तजमील अफजल शेख हिने ९६.२०% गुण प्राप्त करून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला तर माज अश्फाक शेख हिने ९५.८०% व जिद्दांन कुतूबुद्दीन सोलकर तसेच सना तैयब खान याने प्रत्येकी ८५.६०% गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

विद्यामंदिर हायस्कूल कणकवली या प्रशालेचा निकाल ९९.४७% लागला असून सबुरी मंगेश नानचे हिने ९६.८०% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळविला तर मैथिली महादेव कदम ९४.८०% व हिमानी जगदीश गोसावी ९४.२०% गुण प्राप्त करून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. प्रशालेतील एकूण १९२ विद्यार्थी परीक्षेकरिता समाविष्ट झाले होते, पैकी १९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
शंकर महाविद्यालय कुंभवडे या प्रशालेचा निकाल १००% टक्के लागला असून आयुष महादेव सावंत याने ८७.४०% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला तर सुमित सुधाकर गाडेगावकर ८१.२०% व सरिता सुनील सावंत यांनी ७९.४०% गुण प्राप्त करून द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.

सरस्वती हायस्कूल नांदगाव या प्रशालेचा निकाल १००% लागला असून ओम राजेश देसाई याने ९५.६०% गुण प्राप्त केले असून अथर्व अंकुश सदडेकर ९३.२०% व नेहा संतोष कदम ८९.८०% यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

माध्यमिक विद्यालय घोणसरी या प्रशालेचा निकाल १००% लागला असून काजल पांडुरंग जाधव हिने ८४.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे तर प्रियशा राजेंद्र राणे ८१.४०% व तनवी संतोष आचरेकर यांनी ७७% गुण मिळून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे तर प्रशालेतून एकूण २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

आदर्श विद्यामंदिर सावडाव चा निकाल १००% लागला असून धनंजय विद्याधर वारंग याने ८७% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर ओमकार प्रदीप गावकर ७९.४०% व चैतन्य दशरथ फटकारे याने ७२.४०% गुण प्राप्त करून द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे.

नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूल प्रशालेचा निकाल ९८.२४% लागला असून तन्वी संतोष पारकर ९६% गम मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर परी रमाकांत पाटील ९३.६०% व तनवी भीमराव प्रभावळकर ९३.२०% गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

माध्यमिक विद्यालय शेर्पे या प्रशालेत ओंकार संजय सावंत याने ८५.४०% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर नंदिता ज्ञानदेव राऊत ८३.३०% व राजेश चंद्रकांत गोसावी यांनी ८०.४०% गुण मिळवून करून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय या प्रशालेचा निकाल १००% लागला असून समृद्धी सचिन पिसे हिने ८९.६०% गुण प्राप्त केले आहेत. तर स्वानंदी मिथील डंबे ८२.४०% व चैताली प्रशांत तळेकर यांनी ८१.४०% गुण मिळवून करून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
वारगाव विकास मंडळ मुंबई संचलित शेठ म. वी केसरकर हायस्कूल चा निकाल १००% लागला असून निशांत विजय घाडी ८०% गुण मिळवून प्रथम आला आहे. तर तन्मय विलास तळेकर ७९.६०% व चिन्मय दीपक ताम्हणकर ७७% गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!