1.5 C
New York
Monday, February 16, 2026

Buy now

इयत्ता दहावी एसएससी परीक्षेत फोंडा हायस्कूलची ऐतिहासिक यशाला गवसणी

प्रशालेचा निकाल शंभर टक्के ! ७६ व परीक्षार्थी विशेष श्रेणीत तर १७ प्रथम श्रेणी उत्तीर्ण

पंचक्रोशीत अभिनंदन आणि आनंद व्यक्त

फोंडाघाट : दहावी एसएससी २०२४ च्या परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये ७६ परीक्षार्थी विशेष श्रेणीत, १७ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.गेली कित्येक वर्ष प्रयत्नात असलेल्या प्रशाले ने अखेर चालू वर्षी ऐतिहासिक यशाला गवसणी घातली . यामध्ये प्रथम क्रमांक गायत्री विजयकुमार राठोड -९९.२०% द्वितीय मानसी राजन नानचे -९८.६०% तृतीय चिन्मयी राजन चिके – ९८.२०% यांनी उज्वल यश प्राप्त केले. तर सानवि हुले, स्नेहल रेडकर, शौर्य धवन, राहुल कारेकर, श्रद्धा लाड,दर्शन बर्गे, साईनाथ देसाई, पराग नारींगकर, रुपेश रासम,वेलान्कीनी भोगटे, अनिषा चव्हाण, प्रणया सावंत, नंदिनी चव्हाण, कुणाल देसाई, अनुजा ठाकूर, रोहन वाघाटे यांनी ९०% पेक्षा गुण मिळविले. या अभुतपुर्व यशाबद्दल मुख्याध्यापक पर्यवेक्षक ,सहकारी शिक्षक ,विद्यार्थी- विद्यार्थिनी ,पालक वर्ग यांचे अभिनंदन होत असून सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!