कणकवली | मयूर ठाकूर : महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५६८ वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा भवन कणकवली येथे भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा सिधुदुर्ग, महिला शाखा सिधुदुर्ग व तालुका शाखा कणकवली यांच्या वतीने साजरी करण्यात आली.
सकाळी समता सैनिक दलाच्या वतीने धम्मध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी बुद्ध प्रतिमेस पुष्पहार अर्पण दीप प्रज्वलित करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमाताई हरकुळकर यांनी केले. चंदाताई कासले (सरचिटणीस – महाराष्ट्र राज्य महिला शाखा, केंद्रीय शिक्षिका ) यांनी बौध्द धम्म प्रवचन दिले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम, कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, संस्कार, उपाध्यक्ष आर.डी. चेंदवणकर, कणकवली तालुकाध्यक्ष भाई जाधव, पर्यटन उपाध्यक्ष- भिमराव जाधव, संरक्षण उपाध्यक्ष- दिलीप कदम, गुणाजी जाधव, हिशोब तपासणीस- भाऊ कासार्डेकर, सुभास जाधव- सरचिटणीस कणकवली तालुका, कोषाध्यक्ष महेंद्र कदम, प्रकाश पवार – सरचिटणीस मालवण तालुका, उत्तम जाधव, जनिकुमार कांबळे केंद्रीय शिक्षक इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा सरचिटणीस संजय पेंडुरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर यांनी मानले.