29.7 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

त्या आरोपींवर ३०४ चा गुन्हा दाखल करा; जाणवली ग्रामस्थांची मागणी

जाणवली ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात घेतली धाव ; पोलीस निरीक्षकांशी केली चर्चा

कणकवली : दरम्यान जाणवली येथील अपघातातील आरोपी पुणे येथून अटक केल्यानंतर ग्रामस्थांनी कणकवली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांची भेट घेतली. या आरोपींवर ३०४ चा गुन्हा दाखल करा. त्या गाडीत सोबत असणाऱ्या व्यक्ती वर गुन्हा सहआरोपी म्हणून दाखल करावा.अशी मागणी केली. जोरदार धडक देऊन अपघात ग्रस्त व्यक्तीला रक्ताच्या धारोळ्यात रस्त्यावरच टाकून पळणाऱ्या त्या बेदरकार पने वाहन चालविणाऱ्या चालकावर ३०४ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

यावेळी सरपंच अजित पवार, सुदीप कांबळे, दामू सावंत, भालचंद्र दळवी, महेश कदम, मंगेश पवार, बाळा दांगमोडेकर, अशोक कदम, दीपक कदम यांच्यासह जाणवली गावातील बहुसंख्य पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासह समाधानकारक चर्चा केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!