3.5 C
New York
Wednesday, November 13, 2024

Buy now

तिथवली येथे झाड पडून घराचे नुकसान

वैभववाडी : वैभववाडी तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशा झोडपून काढले. तिथवली येथील केशव सखाराम कुडाळकर यांच्या घरावर फणसाचे झाड उन्मळून पाडल्याने मोठे नुकसान झाले आहे. दुपारनंतर आलेल्या पावसाने बाजारपेठेत सर्वत्र पाणीच पाणी झाले.

वैभववाडी तालुक्यात गेली अनेक दिवस पावसाची मालिका सुरूच राहिली आहे. बुधवारी सायंकाळी तालुक्यातील सर्व भागात मुसळधार पाऊस झाला. पावसाचा सर्वात जास्त फटका शहरातील व्यापारी व ग्राहकांना बसला. पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने आठवडा बाजारात आलेल्या ग्राहक व नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

तसेच तिथवली येथील केशव सखाराम कुडाळकर यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळल्याने नुकसान झाले आहे. वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी व पदाधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या नागरिकांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे. अनेक गावांत ठिकठिकाणी रस्त्यावर चिखलमाती आली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!