-0.8 C
New York
Tuesday, January 14, 2025

Buy now

वेंगुर्ले पोलीस स्टेशन हद्दीतील समुद्रकिनारी सागर कवच अभियानास प्रारंभ

वेंगुर्ले | प्रतिनिधी : वेंगुर्ले पोलीस स्टेशन हद्दीतील समुद्रकिनारी २२ मे २०२४ सकाळी ६:०० पासून सागर कवच अभियान सुरू करण्यात आले असून उद्या २३ मे २०२४ संध्याकाळी १८:०० वाजेपर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे.आज या अभियानामध्ये वेंगुर्ला पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आले.

सदरचे अभियान वेंगुर्ले पोलीस ठाणे हद्दीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सदर अभियाना करिता पाच अधिकारी, ३५ अंमलदार तसेच सदर अभियानामध्ये सागर रक्षक दल, पोलीस पाटील व मच्छीमार बांधव यांचा सहभाग आहे. त्याचबरोबर या अभियानामध्ये भारतीय नौदल, भारतीय कोस्ट गार्ड विभाग, भारतीय कस्टम विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, हवामान विभाग, मेरीटाईम बोर्ड यांचाही सहभाग आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!