24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

….तर पुन्हा हायवे बंद करू ; ग्रामस्थांचा इशारा

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली येथे झालेल्या अपघातांमध्ये मृत झालेल्या कुटुंबीयांना राष्ट्रीय महामार्ग व ठेकेदाराने नुकसान भरपाई द्यावी व महामार्गबाबतच्या १६ समस्यांबाबत जानवली ग्रामस्थ अाक्रमक झाले. यापुढील काळात जानवली येथे अपघात झाला तर हायवे बंद करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावर महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव व उपअभियंता अतुल शिवनिवार जाधव व कदम कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करून सदर कुटुंबीयांना मदत देण्यासाठी प्रयत्न केले जातील. महामार्गावरील जानवली ते सावडाव भागापर्यंत सेफ्टी ऑडिट केले जाईल व महामार्गावर सुरक्षितेतेच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्‍वासन जाधव व शिवनिवार यांनी दिले.

जानवली येथे झालेल्या अपघातांमध्ये मृत झालेल्या कुटुंबीयांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदाराने नुकसान भरपाई द्यावी व महामार्गवरील सुरक्षितेतेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासंदर्भात तहसीलदार दीक्षांत देशापांडे यांच्या अध्यक्षतेखाली तहलीसदारांच्या दालनात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता अतुल शिवनिवार, पोलीस निरीक्षक समरेश तडवी, माजी जि. प. सदस्य रंजन राणे, जानवली सरपंच अजित पवार, संदीप सावंत, दामू सावंत, सुदीप कांबळे, भालचंद्र दळवी, श्रद्धा कदम, मनोहर पालयेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कदम व जाधव यांच्या अपघाताला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कारणीभूत आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक कामे अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहेत. याच फटका चालक व हायवे लगतच्या ग्रामस्थांना बसत आहे, ही बाब ग्रामस्थांनी अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिली. महामार्गावरील सुरक्षितेतेच्यादृष्टीने कोणत्याही उपाययोजना न केल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यावरून ग्रामस्थांनी अतुल शिवनिवार व केसीसी कंपनीच्या कर्मचार्‍यांना प्रश्‍नांचा भडिमार करीत चांगले फैलावर घेतले, तर महामार्गावरील सुरक्षितेतेच्यादृष्टीने उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असा खडा सवाल ग्रामस्थांनी शिवनिवार यांना केला. मात्र, या संदर्भात त्यांनी उत्तरे देणे टाळले. त्यामुळे ग्रामस्थांचा संपात अनावर झाला. मुंबई-गोवा महामार्गवरील जानवली ते सावडाव या पुढील काळात अपघात टळण्यासाठी ग्रामस्थांनी 16 उपाययोजनांच्या मागण्यांचे निवेदन शिवनिवार यांना दिले. या संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.

मात्र, या उपाययोजना करण्याबाबत आपल्याकडे अधिकार नसल्याचे सांगून त्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला. यावरून रंजन राणे यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री. जाधव यांच्या मोबाईलद्वारे संपर्क करत महामार्गावरील सुरक्षिततेदृष्टीने ठेकेदाराने न उपाययोजना पाढाच त्यांनी वाचला. महामार्गच्या अपूर्ण कामांबाबत दीक्षांत देशपांडे यांनी देखील श्री. जाधव यांच्याशी चर्चा केली. चर्चेअंती जानवली ते सावडाव दरम्यान असलेल्या भागात सुरक्षितेतच्यादृष्टीने मिडकटल याठिकाणी पांढरेपट्टे मारणे, जि. प. शाळा जानवली येथे रिपेक्टर बसवणे, जंक्शन कट आय बसवणे, महामार्गलगत असेलेले अनधिकृत स्टॉल हटवणे, महामार्गावर असलेले मातीचे ढिगारे हटवणे, रिलॅक्स हॉटेल जवळ अपूर्ण अवस्थेत असलेले गटाराचे काम पावसाळ्यापूर्वी करणे यासह अन्य कामे पूर्ण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. कदम यांच्या मृत्यू कारणीभूत ठरलेल्या चालक अद्यापही फरार असून त्याला पोलीस केव्हा ताब्यात घेणार असा सवाल ग्रामस्थांनी तडवी यांना केला. यावर अपघाताचा तपास सुरू असून चालकाचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!