10.5 C
New York
Friday, November 8, 2024

Buy now

जिल्हा नियोजन अंतर्गत असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करा – नितेश राणे

जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या सूचना

कणकवली : जिल्हा वार्षिक योजनेतील ग्रामीण भागातील विविध विकास कामांना चालना देण्यासाठी व जिल्हा नियोजन अंतर्गत असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आज आमदार नितेश राणे यांनी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या समवेत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या सूचना दिल्या.

आचारसंहितेमुळे गावा गावातील अनेक विकास कामे खोळंबली आहेत. यामध्ये रस्ते, गटारे, वर्ग खोल्या, शाळा दुरुस्तीची कामे, विजयदुर्ग नळपाणी योजनेच्या ना दुरुस्ती मुळे निर्माण झालेला पाणी प्रश्न अशा कामांना गती देण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन अंतर्गत असलेली सर्व कामे तातडीने सुरु व्हावीत याकडे राणे यांनी लक्ष वेधले. विजयदुर्ग नळपाणी योजनेच्या तांत्रिक बिघाडामुळे या योजनेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील काही गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचत आहे. जीवन प्राधिकरण विभागाने या योजनेतील तांत्रिक कामे पूर्ण करून तातडीने पाणीटंचाई दूर करण्यासाठी पावले उचलावीत तसेच जलजीवन योजनेमधून गावागावातील अनेक कामे मंजूर आहेत. परंतु पावसाळा तोंडावर असूनही ही कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी या विभागाने त्याचा पाठपुरावा करावा अशा सूचनाही राणे यांनी केल्या. या बैठकीला ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा वित्त अधिकारी राजश्री पाटील, जलजीवन योजनेचे प्रमुख उदयकुमार महाजनी आदी अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!