29.7 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

सावंतवाडी भर वस्तीत गवा रेड्यांचा वावर | नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सावंतवाडी : शहरात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास माठेवाडा सावंतवाडी येथील डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या डॉ परूळेकर नर्सिंग होम समोरील रस्त्यावरून दोन मोठे गवे हॉस्पिटलच्या पायऱ्या चढून आक्रमक रित्या हॉस्पिटल समोर आले आणि हॉस्पिटलच्या डावीकडील भागात धावत पुढे गेले. पुढील वाट बंद असल्याने शेजारच्या शिर्के यांच्या अंगणात त्यांनी लावलेले पत्रे उडी मारून, फाडून मागच्या बाजूला असलेल्या जंगल भागात नाहीसे झाले. अशा रितीने सावंतवाडी शहरात डांबरी रस्त्यावरून येऊन उंचावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये आक्रमक रित्या गवारेडे येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नेहमी हॉस्पिटलच्या समोर अनेक पेशंट आणि त्यांचे नातेवाईक रुग्ण तपासणीच्या प्रतिक्षेत उभै असतात, आज सगळेजणं वेटींग रुममध्ये बसलेले होते म्हणून मनुष्यहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. डॉ जयेंद्र परुळेकर यांनी जिल्हा वनसंरक्षक यांच्या कानावर झालेला प्रकार घातलेला असून पंचनामा होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!