कणकवली : तेजस सेल्स अँड सर्व्हिसच्या दुसऱ्या शाखेचा भव्य शुभारंभ सोहळा १७ मे २०२३ रोजी कणकवली शहरात,पटवर्धन चौक, मुंबई – गोवा महामार्गालगत,जुना भाजी मार्केट येथे दिमाखात आणि उत्साहात करण्यात आला.
तेजस सेल्स अँड सर्व्हिसचे प्रोपरायडर श्री.रोहित खारकर हे गेली 25 वर्षे चिंतामणी विहार बिल्डिंग,जाणवली पुलाजवळ, महाजन नगर कणकवली येथे गेली 20 वर्षे आपल्या ग्राहकांना चांगल्या प्रकारे सेवा देत देवुन अनेकांची मन जिंकत आहेत.
माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांच्या उपस्थितीत तेजस सेल्स अँड सर्व्हिसचे प्रोपरायडर श्री.रोहित खारकर यांना पुष्गुच्छ देवुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी तेजस सेल्स अँड सर्व्हिसचे प्रोपरायडर रोहित खारकर, संगीता खारकर, स्नेहा खारकर, अश्विनी खारकर, कल्पेश यादव, बिर्जेस यादव, माऊली मित्रमंडळाचे सदस्य अविनाश गावडे ,भगवान कासले , प्रसाद पाताडे ,लक्ष्मण महाडिक, बाबुराव घाडिगावकर, हेमंत नाडकर्णी, सचिन कुवळेकर, योगेश पवार, समीक्षा धुरी,सायली आईर, आरोही गुरव, भारती फाटक, मंगल शंकर राठोड, मंगेश जाधव, जमिल कुरैशी, ओंकार चव्हाण, प्रभाकर कदम, प्रकाश चव्हाण, सईद नाईक, देवराज जाधव, महेश वांयगणकर, नुरमहम्मद शेख, शकिल शेख, बशीर पटेल, अविनाश जैताळकर, निलेश निखार्गे, राम शाम सुर्यवंशी, आशिष कुमार परब सह जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ, अप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थीत होते.
यावेळी माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर म्हणाले की ,तेजस सेल्स अँड सर्व्हिसचे प्रोपरायडर श्री.रोहित खारकर हे गेली 25 वर्षे जाणवली येथे सुतार कामासाठी लागणारे साहित्य, आणि झाडे तोडण्यासाठी लागणारे साहित्य एकाच ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करुन देवुन ग्राहकांची मने जिंकत होते. आज कणकवली शहरात तेजस सेल्स अँड सर्व्हिसच्या दुसऱ्या शाखेचे कणकवली शहरात जूना भाजी मार्केट येथे सूरु केली असल्याने, श्री.खारकर यांना श्री.पेडणेकर यांनी शुभेच्छा दिल्या.