22 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

धाकधूक वाढली | बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आलीये.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे निकालाची वाट सतत पाहत होते. काही दिवसांपूर्वीच बोर्डाकडून हे स्पष्ट करण्यात आले की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात लागेल. त्यानंतर आता नुकताच बोर्डाकडून मोठी घोषणा करण्यात आलीये. आता विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा ही संपलीये. आता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने उद्या म्हणजे २१ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलंय. त्यानंतर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल.

१) mahresult.nic.in
२) mahahsscboard.in
३) hsc.mahresults.org.in
४) hscresult.mkcl.org
५) results.gov.in.

या साईटवर जाऊन विद्यार्थी हे आपला बारावीचा निकाल आरामात पाहू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी परीक्षा क्रमांकाची आवश्यक आहे. यंदाच्या निकालाच कोण बाजी मारणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. यंदा निकालाची टक्केवारी वाढणार असल्याचीही चर्चा आहे.

यंदा राज्यामध्ये तब्बल १४ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. दरवेळी प्रमाणे यंदा देखील राज्यात संपूर्ण परीक्षा ही काॅपीमुक्त पार पडलीये. बोर्डाकडून या परीक्षेची जोरदार तयारी काही महिन्यांपासून सातत्याने सुरू होती. आता उद्या निकालाची घोषणा देखील केली जाणार आहे.

आता लवकरच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाबद्दलची देखील मोठी घोषणा केली जाऊ शकते. बोर्डाकडून अगोदरच हे स्पष्ट करण्यात आलंय की, दहावीचा निकाल मेच्या चाैथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल.

बारावीचा निकाल ९ विभागांमध्ये लागणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा एकूण नऊ विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. आता कोणत्या विभागातील विद्यार्थी हे अव्वल राहतात, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!