29.7 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

खाडीत बुडणाऱ्या युवकाला जिवदान देणाऱ्या दाजी बटवलकरचा भाजपा च्या वतीने सत्कार

वेंगुर्ला : वेंगुर्ले मांडवी खाडीमध्ये पोहण्यासाठी उतरलेले युवक गौरव देवेंद्र राऊळ व यश भरत देऊलकर हे दिनांक १६ मे रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडु लागले, त्यावेळी त्याठिकाणी असलेले मच्छिमार दाजी बटवलकर यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता गौरव देवेंद्र राऊळ या युवकास वाचवले . परंतु दुसरा युवक पाण्याच्या प्रवाहाबरोबर वहात गेल्यामुळे त्याला वाचवु शकला नाही .

वेंगुर्ले शहरातील दाभोसवाडा येथे रहाणारे दाजी बटवलकर हे व्यवसायाने मच्छिमार असून त्यांनी आपला जिव धोक्यात घालून एका युवकास जिवदान दिले याबद्दल वेंगुर्ले शहरात त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे .

त्यांच्या या धाडसी वृत्तीची दखल घेत भाजपा वेंगुर्ले च्या वतीने मांडवी येथील झुलत्या पुलावर मच्छिमार नेते वसंत तांडेल यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर , मच्छिमार सेलचे दादा केळुसकर , युवा मोर्चाचे भुषण सारंग व मनोहर तांडेल , किरण कुबल , शाम खोबरेकर , विकी फर्नांडिस इत्यादी उपस्थित होते .

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!