13 C
New York
Sunday, October 13, 2024

Buy now

अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्या युवकाला अटक

कणकवली : अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या आकाश अंकुश मेस्त्री (१९, ओझरम माळवाडी) याला कणकवली पोलिसांनी उपनिरीक्षक राजकुमार मुंढे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथून बुधवारी अटक केली. त्याला गुरुवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. संशयिता विरोधात बालकांवरील लैंगिक अत्याचाराचा गुन्हाही (पोक्सो) दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदरची १५ वर्षीय शाळकरी मुलगी बेपत्ता झाल्याची घटना रविवारी पहाटेला उघड झाली होती. तिला कुणीतरी फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिली होती. दरम्यान, सदर मुलगी व संशयित पंढरपूर येथे असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन दोघांनाही ताब्यात घेतले. संशयित व पीडित मुलीची पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. त्यामध्ये संशयिताने सुपली (ता. पंढरपूर) येथे एक खोली भाड्याने घेतली. त्याच ठिकाणी १३ मे रोजी संशयिताने आपल्यावर अत्याचार केले, असे मुलीने पोलिसांना सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!