23.2 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

मुंबई – गोवा महामार्गावर इन्होवा कारला अपघात ; कारचे मोठे नुकसान

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हा कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने मुंबई – गोवा महामार्गवरील हळवल फाट्यानजीक गडनदी ब्रिजवरील दुभाजकाला कारची जोरदार धडक बसली व कार पलटी झाली. सदरच्या अपघातात ७ जण जखमी झाले. हा अपघात मुंबई – गोवा महामार्गावर बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला होता.

गोव्याहून मुंबईच्या दिशेने इनोव्हा कार घेऊन जात असताना हळवल फाटा दरम्यान कार आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारची नजीकच्या दुभाजकावर जोरदार धडक बसली व पलटी झाली. अपघातात बेगम महमंद हनिफ चौकापूर ( वय ४० ), आयान मुकत्यार गन्नेवाले ( वय १४ ), मौला गुलाबसाब शिगाली ( वय २८ ), बाशिरा मम्मदगौस हकूलदार ( वय ७२ ), अमीर मम्मदगौस हवालदार ( वय ३३ ), आलिया महाबुसाल शिगाली ( वय ११ ), पाईजा जापर कुमुमय ( वय ११. सर्व रा. ( मडगाव – गोवा) हे जखमी झाले. अपघातग्रस्तांना तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!